Thursday, October 19, 2006

Puzzle

मला फार आवडलेले एक कोडे...

समजा एका जंगलात दोन गुहा आहेत, एक आहे जीवनाची गुहा, आणि दुसरी आहे मृत्युची गुहा. दोन्ही गुहे समोर प्रत्येकी एक रक्षक उभा आहे. या रक्षकांपैकी एक जण केवळ खरेच बोलतो तर दुसरा केवळ खोटेच बोलतो. कल्पना करा की तुम्ही त्या दोघांच्या समोर उभे आहात. तर तुम्हाला त्या दोघांपैकी कुणालाही एक असा प्रश्न (दिशादर्शक)विचारायचा आहे की समोरच्याने तुम्हाला जीवनाच्याच गुहे कडे जाणारा मार्ग दाखवला पाहिजे. लक्षात असु द्या त्यांच्या सवयी, खरे आणि खोटे बोलण्याच्या आणि हे सुद्धा लक्षात असु द्या की तुम्हाला याची कल्पना नाही की त्यातिल कोण खरे बोलतो आणि कोण खोटे, पण त्या दोघांना मात्र आपसात याची कल्पना आहे की आपणांपैकी कोण खरे बोलतो आणि कोण खोटे. ...

करा विचार..

...

...
असा प्रश्न की जो दोघांपैकी कुणालाही विचारला तरी उत्तर तेच मिळेल, अर्थात जीवनाच्या गुहेकडे जाणारा मार्ग.. एकच प्रश्न...


विचार सुरु ठेवा,... हा विनोदी प्रश्न नाही हे लक्शात घ्या...




काय नाही जमत म्हणुन कसे चालेल कागद आणि पेन घ्या आणि प्रयत्न करा, ....


ज्या तत्वाच्या आधारे उत्तर येणार आहे ते आपण दहावीच्या वर्गात शिकलो आणि संगणकाच्या जगात याचा फार मोठा वापार होतो...


अजुनही नाही

प्रयत्न करा आणि उत्तर










उत्तर :

तुझ्या शेजारचा मला मृत्युची गुहा म्हणुन कुठली गुहा दाखवेल

प्रयत्न करुन पहा..

1 comment:

Vishal Khapre said...

प्रश्न : जीवनाची गुहा कोणती हे जर मी दुसऱ्या रक्षकाला विचारले तर तो काय उत्तर देईल?

दोन्ही रक्षक एकच उत्तर देतील, जे उत्तर देतील तो मरणाच्या गुहेचा मार्ग असणार, तुम्ही दुसरी गुहा निवडावी.

प्रश्न जर मरणाच्या गुहेचा विचारला तर जीवनाच्या गुहेचे उत्तर मिळेल,आणि तुम्ही तो मार्ग निवडावा.

अशा प्रकारे तुम्ही जगाल. कोडे झकास होते.

शहाणा माणूस अशा जंगलात का जाईल? अशा जंगलात जाणारे लोक नक्कीच मुर्ख असणार, त्यामुळे अशावेळी हे कोडे ते नक्की सोडवु शकणार नाहीत आणि नक्की मरणार. :)) :))