घनदाट या शब्दाचा पुरेपुर अर्थ कळतो वासोट्याला गेल्यावर. गच्च भरलेल्या वाटेवरुन मार्गक्रमण करतांना निसर्गाच्या कमालीचा अनेक वेळा प्रत्यय येत होता. आंबोळगीची चव अजुनाही तोंडावर रेंगाळते आहे.
ट्रेकर्सची पंढरी, इतरांना सर येईल काय
'भयाण' रस्ता तरिही, ओढीने चालती पाय
'घनदाट' जंगल अन पाण्यातुन प्रवास
याची साठी केला होता हा अट्टहास
नितळ पाणी ओढ्याचे, मारुती मार्गदर्शक
मनोहर विश्रांतीस्थळ अन बाबुकड्याचा धाक
उंच उंच झाडी, अन रानफुलांचा सुवास
याची साठी केला होता हा अट्टहास
मन झाले सैरभैर, कंठ आला दाटुन
असावीस तू आसपास, क्षणभर गेले वाटुन
इथे मी अन तिथे तू, मन होई उदास
याची साठी केला होता हा अट्टहास
Subhash Dike (सुभाष डिके)
1 comment:
माझी नारोटी......
नागेश्वर झाले सर वरी अविरत धार
जणू देवाच्या स्पशा॑ने फुटे दगडा पाझर
चराचरातून झाला साकार इतिहास
याची साठी केला होता हा अट्टहास
Post a Comment