आमच्या लहानपणी आम्ही एक कोडं घालत असु
कागद फाडतो पण वेडा नाही,
पैसे मागतो पण भिकारी नाही,
घंटा वाजवतो पण पुजारी नाही,.. ओळखा पाहु कोण
उत्तर अर्थातच कंडक्टर..
प्रत्येकाच्या लहानपणी हेवा वाटणार्या अनेक व्यक्तींपैकी कंडक्टर हा एक नक्की असेल, मग तो कुठल्याही कारणा मुळे असेल, त्याच्या कडे एवढे पैसे मिळतात जमा होतात मग ते त्याच्याकडेच रहात असतील काय?, किंवा त्याला किती तरी गाव फुकट फिरायला मिळतात वैगरे.
कंडक्टर या व्यक्तीविशेषाशी आपला अनेक वेळा संबंध येत असतो, सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत महत्वाचा भाग असलेला हा कंडक्टर. कंडक्टर ला मराठीत वाहक हे नाव आहे पण कंडक्टर मधे जो जोर आहे तो वाहक या शब्दात नाही. मी प्रत्येक वेळा गाडीत बसलो की या कंडक्टर्चे निरिक्षण करत असतो, शक्य असेल तर कंडक्टर च्या शेजारचीच जागा मिळवतो. प्रत्येक कंडक्टरने दाढीचे खुंट वाढवलेलेच असावेत असा त्या खात्याचा अलिखित नियम असवा बहुधा, कारण जवळ्पास ९०% कंडक्टर तसेच येतात नेहमी, आणि जो दाढी वैगरे व्यवस्थीत करुन आला आहे तो नवशिका आहे असं समजावं. त्याच प्रमाणे आणखी एक वैशीष्ट्य म्हणजे बर्याच कंडक्टर ना चष्मा नसतो, म्हणजे कंडक्टर मधे चष्मा असणार्यांची संख्या खुपच कमी असावी, असे नसेलही बहुतेक पण मला तरी तसे बर्याच वेळा जाणवले. काही कंडक्टर आतुन त्यांचा नेहमीचा शर्ट घालुन मग वरुन Uniform चढवतात.
कंडक्टर च्या विश्वात अनेक गोष्टि आपल्या आकलनापलिकडील असतात एस. टी. चे कंडक्टर आपल्या बरोबर एक पेटी नेहमी बाळगतात,मला वाटतं त्यांना ही पेटी खात्या कडुन मिळत असावी बहुधा कारण आत्ता पर्यंत मी पाहीलेल्या सर्व पेट्या एकाच प्रकारच्या होत्या. ही पेटी कंडक्टरच्या सीट च्यावर साखळीने बांधुन ठेवलेली असते, या पेटीत नेमके काय असते कुणास ठावुक. कंडक्टर ना आपल्या कडील एका कागदावर कसल्या तरी नोंदी कराव्या लागतात, ते नेमके काय लिहितात हे पाहण्याचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण Doctor च्या prescription सारखीच कंडक्टर च्या नोंदीची एक विशिष्ठ लिपी असते, आणि ती कदाचित फक्त त्यंच्याच अधिकार्यालाच वाचता येत असावी. कदाचीत तिकिट किती संपले असे लिहित असावेत. एवढ्या हालणार्या गाडीत बसुन सुद्धा ते अगदी व्यवस्थीत लिहित असतात. मला वाटते यांना Retirement नंतर घरी काही लिहायचे असेल तर एक सतत हालणारा टेबल लागत असेल. या नोंदी
प्रमाणेच तिकिटावर कुठे पंच मारावा लागतो हे ही एक वैशिष्ट्य, मला वाटते टप्प्यांप्रमाणे पंच मारत असतील, पण त्यात वेगळे पण असे की एस. टि च्या बस मधे पासुन आणि पर्यंत अश्या दोन्ही ठिकाणि पंच करतात पण शहर बस सेवेत मात्र केवळ एकाच ठिकाणी पंच करतात. मी बंगळुर शहरात तर एक वेगळाच प्रकार अनुभवला, तिथे तिकिट काढुन तुमच्या हातात देतांना त्यावर पंच करत नाही, त्या ऐवजी थिएटर मधे फाडतात तसे तिकिट पाडतात, (दोन भाग करत नाहीत) आणि मग तुमच्या हातात देतात. अशीच आणखी एक गोष्ट म्हणजे, समजा चालु गाडिमधे गर्दी कमी आहे आणि कंडक्टर पुढच्या दरवाजात उभां राहुन Driver सोबत बोलत असेल, त्याच वेळी जर कुणाला उतरायचे असेल तर कंडक्टर घंटीच का मारतो कुणास ठावुक, कधिही तो Driver ला तोंडने थांब म्हणत नाही, अगदी बाजुला उभा असेल तरीही.
कंडक्टर च्या स्वभावाचे अनेकविध नमुने आपण सर्वांनीच अनुभवले असतील. Electronics मधे Good Conductor आणि Bad Conductor अशी concept असते, ती खरी ठरते या कंडक्टर च्या बाबतीत सुद्धा. काही कंडक्टर रागीट असतात, काही अगदिच सौम्य, काही गोंधळलेले असतात तर काही अगदिच तरतरीत.सकाळी सकाळिच तुमची एखाद्या रागीट कंडक्टर सोबत मुलाखात झाली मी मग दिवसाची सुरुवातच खरब होते, हे रागीट कंडक्टर मंडळी या ना त्या कारणाने नुसते ओरडत असतात, मग ते तिकिटासाठी असेल, सुट्ट्या पैशांसाठी किंवा नुसत्याच पुढे सरका पुढे सरका अश्या आरोळ्या असतील., या उलट काही कंडक्टर चा खुपच चांगला अनुभव येतो, अनोळखी माणसाला त्याच्या पत्त्या प्रमाणे नेमके कुठे उतरणे सोयीचे पडेल हे सांगतील एवढेच नव्हे तर उतरल्यानंतर कुठली बस पकडावी ते सांगतील, गर्दी झाली तरी अत्यंत सौम्य शब्दात "अहो पाटिल पुढे चला", "ताई, तुम्ही बसु शकता" वैगरे अशा शब्दांनी बोलावतात. अशा कंडक्टर च्या बस मधुन गेलात की मग प्रवासाचा शिण बर्यापैकी निघुन जातो. कंडक्टर चा सर्वात मोहक प्रकार बघायचा असेल तर तो छोट्या गावाकडील मुक्कमी गाडीत बघावा, संध्याकाळी तालुक्याच्या गावावरुन गाडी निघते, आणि मग तिकीट काढता काढता कंडक्टर साहेब वैयक्तीक चौकशी सुरु करतात, रोजचीच गाडी असल्यामुळे त्याची प्रत्येकाशी ओळख असतेच, मग "काय पाटील साहेब, झालं का कोर्टाचं काम?", "काय रे बाळ्या कसा गेला पेपर?","काय जावईबापु,दिवाळसण वाटत?", "काय तात्या, काय म्हणाले doctor ? ", अशा गप्पा सुरु होतात.
कंडक्टरचं काम तस पहाता खुप कौशल्याचं असतं,विशेष म्हणजे शहरातील गाड्यांचे कंडक्टर. जेमतेम उभं राहण्यापुरती जागा, आणि त्या तेवढ्याश्या जागेतुन इकडुन तिकडे तिकिट द्यायचे (ते सुद्धा पैशाचा हिशोब न चुकु देता), दोन दोन मिनिटांवर येणारे थांबे बघुन बेल मारायचि, मधेच एखादा अतिउत्साही व्यक्ती स्वतःच बेल मारतो, मग त्याच्यशी जुंपते, सुट्ट्या पैशांचा गोंढळ होतो, मधेच एखाद्या महीला आरक्षीत सीट वर कुणी पुरुष बसलेला दिसतो त्याला उठवावे लागते, अशा अनेक प्रसंगाना त्याला एकाच वेळी तोंड देत त्याला गाडी शेवट पर्यंत न्यायची असते. अनेकदा कंडक्टर गाडीच्या खाली राहुन गाडी निघुन गेल्याचे आपण पेपर मधुन वचतच असतो. अश्या अनेक प्रसंगाना कंडक्टर ला तोंड द्यावे लागते, एस. टी च्या कंडक्टर वर ही वेळ अनेकदा येते आडवळणाच्या एखाद्या गावात गाडी बिघडते, मग ती ढकलण्यासाठी लोकं गोळा करण्याचं काम कंडक्टर कडेच येत असतं. अपघात वैगरे झाला तरी कंडक्टर लाच त्याची सुचना द्यावी लागते, प्रवासी मंडळी मधे आपापसात होणार्या भांडणात सुद्धा त्यालाच हस्तक्षेप करावा लागतो. प्रवासी मंडळि सुद्ध कंडक्टर सोबत खेळ खेळत असतात, मुलाचे वय हाफ तिकिट काढण्या इतपत आहे हे पटवण्यात आई वडील दंग असतात तर त्यचे वय पुर्ण तिकिट घेण्या एवढे आहे हे कंडक्टर पटवुन देत असतो., तोच प्रकार ६५ वर्ष्याच्या सवलतीचा.कधी कधी एखादा प्रवाशी एक्-दोन रुपये कमी आहेत तरी पण तिकिट द्या असा आग्रह धरतात तर काही माझ पाकीट हरवलं मला बसु द्या अश्या विणवण्या करतात. अशा वेळी कंडक्टर निष्कामकर्मयोग साधत असतील. आही कंडक्टर महाचालु असतात, लोकांचे तिकिट दिल्यानंटर सुट्टे पैसे देण्याचे टाळतात, आणि मग लोकांच्या विसरण्याच्या गुणांमुळे ते पैसे त्यंनाच मिळुन जातात. मी तर असे अनेक वेळा एक्-दोन रुपये विसरुन गेलो आहे. प्रत्येक वेळी पैसे विसरल्यावर आता पुढच्या वेळी नक्की लक्षात ठेवायचे ठरवतो, आणी पुढच्या वेळि कंडक्टर पैसे उतरतांना घ्या असे सांगितले की उतरे पर्यंत पैसे घेउयात, नाही दिल्यास त्याची तक्रार करुयात वैगरे अनेक कल्पना सुचुन जातात, आणि नेमका तो कंडक्टर प्रामाणिक निघतो आणि आठवणीने पैसे देतो.
कंडक्टर मधे काही विशेष गुण असावे लागतात, या कंडक्टरची निवड प्रक्रिया कशी असते माहीत नाही पण मला वाटते त्यांना असे प्रश्न विचारत असावेत ,"अमुक गावावरुन तमुक गावा पर्यंत पाच फुल आणि तीन हाफ चे किती पैसे होतील", "... गावावरुन... गावाचे अंतर किती", "एक गाडी दोन तासाच्या प्रवासात पाच वेळा थांबली तर तिचा स्पीड ओळखा".. वैगरे. या कंडक्टर ना आपली पैशाची bag सांभाळण्याचे एक विशेष प्रशिक्षण देत असावेत कारण त्यात नेहमी एवढे पैसे असुनही ती bag चोरीला गेल्याचे मी तरी कधी ऐकले नाही, त्याच बस मधुन महीलांची पाकीटे पळविली जातात पण कंडक्टरची bag मात्र सुरक्षीत असते. कंडक्टर च्या व्यवसायात वेंधळेपणा आजिबात चालत नसेल्कारण प्रत्येक दिवशी संध्याकाळी तिकिटाचे पैसे जमा करतांना तिकिटे आणि पैसे यांचा हिशोब जुळलाच पाहीजे.
कंडक्टरच्या जीवनात हाल सुद्धा कमी नसतात. कामाचे तास कमी जास्त होत रहातात, गाडीतच झोपावे लागते,जेवण कुठे आणि कसे मिळेल याची शाश्वती नाही, गाडी कितिही निसर्गरम्य स्थळामधुन जात असेल तरीही बाहेर लक्ष देता येत नाही, गाडीत झोपता सुद्धा येत नाही, नेहमी लक्ष प्रवाश्यांकडेच, घरापासुन बर्याचदा दुर रहाणे, मुलांकडे दुर्लक्ष असे एक ना दोन अनेक समस्या असतात.
चित्रपट सृष्टीचे सुद्धा या कंडक्टर कडे लक्ष जात असते, मेहमूद ने साकारलेला कंडक्टर आपणा सर्वांना
आठवत असेल. मराठी चित्रपटातुन तर नेहमी कंडक्टरची व्यक्तीरेखा हमखास आढळते. आणि तेच त्याची आपल्या जीवनातील अपरिहार्यता प्रकट करते. कंडक्टर कडे तसे विशेष कोणीही लक्ष देत नाही, कारण त्याच्या व्यतीरिक्त बघण्यासारख्या, विचार करण्या सारख्या अनेक गोष्टी असतात. थोड्या वेळाच्या प्रवासाचा सोबती असणार्या या कंडक्टर वर काही लिहावसं वाटला म्हणुन आपला हा छोटासा प्रयत्न..
सुभाष डिके

1 comment:
कंडक्टर ब्लॉग आवडला.
मुलांच्या मासिकात छापुया का ?
तपशिलासाठी :
www.braintonic.in
Post a Comment